श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी आज बेळगावातील केएलई इस्पितळाला भेट देऊन गोळीबारात जखमी झालेले श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी हिंडलगा तुरुंगाजवळ होती. या घटनेत कोकितकर यांच्या मानेजवळून गोळी जाऊन चालकाच्या हातात घुसली होती. त्यानंतर या दोघांनाही तातडीने केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी आज बेळगावातील केएलई इस्पितळाला भेट देऊन कोकितकर व त्यांच्या चालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. घटनेसंदर्भात त्यांनी माहिती घेतली.


Recent Comments