Khanapur

विठ्ठल हलगेकर यांचा वाढदिवस उत्साहात :”शिवगर्जना ” या भव्य नाटकाचे उद्घाटन

Share

खानापुर शहराच्या हद्दीतील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात महालक्ष्मी ग्रुप तोपीनकट्टी व भाजपा खानापुर मंडळाच्या वतीने गाजलेल्या , “शिवगर्जना ” या भव्य नाटकाचे उद्घाटन व विठ्ठल हलगेकर यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला.

अवघ्या दोन रुपयांपासून सुरू झालेला महालक्ष्मी ग्रुप तोपीनकट्टी , आज ही संस्था खानापूरच्या जनतेसोबत चारशे कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांत मंजुनाथ भारती महास्वामी होते.त्यांच्यासोबत आवरोली बिलकीरुद्रस्वामी मठाचे चन्नबसव देवरु यांच्यासह इतर महास्वामी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी लैला साखर कारखान्याच्या , महालक्ष्मी ग्रुपचे एम.डी.सदानंद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत करून आमचे नेते विठ्ठल हलगेकर जे आमच्या संस्थेचे सभासद आहेत, यांची समाजसेवा गेल्या काही वर्षांपासून दिसून येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते शंकरगौडा पाटील, संजय पाटील, संजय कुबल यांच्यासह विठ्ठल हलगेकर यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवगर्जना महानाटकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती . महालक्ष्मी ग्रुपने पंचवीस हजार लोकांची आसन व्यवस्था केली होती पण चाळीस हजार लोकांनी सहभाग घेतला.एकूणच या शिवगर्जना नाटकाला , खानापूर वासियांचा प्रचंड प्रतिसाद लाभला .

Tags: