Belagavi

हिंदु जनजागृती समितीचे प्रांतीय हिंदु अधिवेशन उत्साहात

Share

धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात बेळगावात आज एकदिवशिय प्रांतीय हिंदु अधिवेशन पार पडले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हे एकदिवशीय अधिवेशन अनसूरकर गल्लीतील छत्रेवाडा येथे पार पडले. सकाळी 11.00 वाजता शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. यानंतर पुरोहित वासुदेव छत्रे  यांच्या चैतन्यपूर्ण वाणीत वेदपठण केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सकाळच्या सत्रात बोलताना, हिंदुनी हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी संविधानाचा अभ्यास सर्वांनी करावा असे आवाहन ज्येष्ठ अधिवक्ता अशोक पोतदार यांनी केले. आजची हिंदूची सध्यस्थिती पाहता, हिंदुवर होणारे आघात रोखायचे असतील तर हिंदु संघटीत होणे खूप आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ‘हिंदु राष्ट्र’ हे सर्व समस्यांवर एकमात्र उपाय असल्याचे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले.

‘हलाल इकॉनॉमी-एक आर्थिक जिहाद’ यावर बोलताना हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक हृषिकेश गुर्जर म्हणाले, देशात अनधिकृतपणे धर्माच्या आधारावर हलाल लोगो असलेले प्रमाणपत्र जनसामान्य वापरत असलेल्या उत्पादनांवर छापून सहस्रो कोटी रूपये संग्रहीत करून धर्मांध संघटना त्याचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करत आहेत. केंद्र शासनाची एफएसएसएआय ही प्रमाणपत्र देणारी संस्था असून देखील धर्माच्या आधारावर ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे हे संविधानाच्या विरोधी आहे. ते त्वरीत रद्द करावे. हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा देशद्रोही कारवायांसाठी वापरला जात आहे असा आरोप त्यांनी केला.

यावेळी देशातील हिंदू धर्माची स्थितीगती, पुढील काळात करावयाचे उपाय आदींवर विचारमंथन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील  विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते.

Tags: