Belagavi

विद्यार्थ्यांच्या हातातच देशाचा विकास :केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Share

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 42 व्या राज्यस्तरीय संमेलनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला . केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या तीन दिवसीय संमेलनाचे उदघाटन केले .

बेळगावमधील , नेहरू नगर येथील , केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तीन दिवसीय संमेलन सुरु आहे . केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संमेलनाचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि , माणसाच्या आयुष्यात , तीन अवस्था महत्वाच्या आहेत . बाल्यावस्था , तारुण्य आणि वृद्धावस्था महत्वाची आहे . तारुण्यावस्थेत बऱ्याच गोष्टी सकारात्मक करण्याची ताकद असते . हेच काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत असते . विद्यार्थी ही देशाची ताकद असून , देशाचा विकास हा विद्यार्थ्यांच्या हातातच आहे .

यावेळी , डॉ . प्रभाकर म्हणाले कि , तांत्रिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे . अलीकडे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे . त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे . त्यामुळे कमी वयातच विद्यार्थ्यांना आजाराचा सामना करावा लागत आहे .

यावेळी राणी चन्नमा विद्यापीठाचे कुलपती डॉ . रामचंद्र गौड , अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ . अल्लमप्रभू गुड्डू , डॉ . सतीश , डॉ . रोहिणक्ष शिर्लालू , मणिकंठ कळस आदी तसेच अभाविपचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: