कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि.०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा..नितीन सावंत असणार आहेत.तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रप्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे .
संमेलनाचे उद्घाटक म्हणून यल्लोजीराव पाटील उपाध्यक्ष ग्राम पंचायत कंग्राळी बी.के., पॅालीफ्लो व पॅालिहैड्रोन पुरस्कृत स्वामी विवेकानंद नगरीचे उद्घाटक मेकॅनिकल इंजिनिर मा.कुशल कुट्रे राणी चन्नम्मा नगर बेळगाव,सांगाती व्यासपीठाचे उद्घाटक प्रा.एच.के गावडे चेअरमन , सांगाती पतसंस्था,शाखा चंदीगड, ग्रंथ दालनाचे उद्घाटन मोहन पाटील शहापुर बेळगाव,शिवप्रतिमा पुजन निवृत्त कॅप्टन सुनिल पाटील कडोली,सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन गिता सावंत चन्नम्मा नगर बेळगाव,सरस्वती प्रतिमा पूजन नेत्रा नी मेनसे वडगाव बेळगाव,संत ज्ञानेश्वरी प्रतिमा पुजन रुक्मिणी निलजकर, वैशाली खडीमशीन कंग्राळी खुर्द
बेळगाव,महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पुजन .धनश्री होनगेकर कडोली बेळगाव तर ग्रंथदिंडी सकाळी अकरा वाजता सुरु होणार .असुन पालखी पुजन ह.भ.प.प्रवीण मायाण्णा , कडोली करणार आहेत .
तर सत्र पहिले सकाळी १०.३०.ते १२.३० वाजेपर्यंत होणार असून , उद्घाटन समारंभ व समेलनाध्यक्ष मा.श्री.नीतीन सावंत परभणी यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे .
दुसऱ्या सत्रामध्ये निमंत्रितांचे कविसम्मेलन दुपारी १२.३०ते २-०० या वेळेत , स्नेह भोजन दुपारी २.००-ते २.३० या वेळेत होणारं आहे .
सत्र तिसरे दुपारी २.३० ते ३.३० ” माझा मराठाची बोलू कवतिंके” या विषयावर व्याख्यान होणार आह ए.
सत्र चौथे दुपारी ३.३० वा. शिवशाहिर व्यंकटेश देवगेकर यांचा , सिंह गर्जतो हा शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम होणार आहे . कडोली साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.संमेलनाची जय्यत तयारी चालु असुन पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीमध्ये गुंतले आहेत.
Recent Comments