ग्राहक रक्षण कायद्यातील तरतुदींचा लाभ घेऊन ग्राहक म्हणून होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी केले.
बेळगावातील कन्नड साहित्य भवनात आज शनिवारी जिल्हा प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा खाते, जिल्हा ग्राहक तक्रार मंच, वजन-मापन खाते, शिक्षण खाते, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, जिल्हा ग्राहक माहिती केंद्र आदींच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याचे उदघाटन अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी केले. यावेळी कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य-सचिव न्या. पी. मुरली मोहन रेड्डी, ग्राहक मंचाच्या सदस्या सुनंदा काद्रोळीमठ, डीडीपीआय बी. एम. नलतवाड, जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष राचप्पा तालिकोटी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यानंतर बोलताना अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी म्हणाले, अनेक दुकाने, व्यापारी आस्थापनांत ग्राहकांची वजन-मापात सर्रास फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळून ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकारने अनेक कडक कायदे आणले आहेत. त्यांची माहिती करून घेऊन ग्राहकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी स्वागत करून कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. ग्रॅहम मंचाचे अपर अध्यक्ष संजीव कुलकर्णी यांनी ग्राहक दिनानिमित्त मुद्रित केलेल्या जागृतीपत्रकाचे प्रकाशन केले. यावेळी विविध खात्यांतर्फे ग्राहक जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
यावेळी तेजस्विनी गॅस एन्टरप्राइजेसतर्फे विध्यार्थ्यांना गॅस सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्याचा जागृती कार्यक्रम घेण्यात आला. ‘तेजस्विनी’चे आशिष कालकुंद्री, अभिषेक कालकुंद्री यांनी विध्यार्थ्यांना माहिती दिली. मॅनेजर रामकुमार बिष्णोई, रमेश आदी उपस्थित होते. मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. फ्लो
कार्यक्रमाला विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments