बेळगाव शहरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४२ व्या संमेलनानिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली .
बेळगाव शहरात अभाविपचे 42 वे संमेलन सुरु आहे . काल संध्याकाळी , केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन करण्यात आले . शनिवारी संध्याकाळी चार वाजता , जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली . अनेक तरुण तरुणी पारंपरिक पेहराव करून , या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या . भगवे फेटे परिधान करून अभाविपचा ध्वज घेऊन हजारो विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते . यावेळी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या .

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य सचिव , नाडीकत्त कळस यांनी सांगितले कि , बेळगावमधील जिरगे सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ३ दिवसीय संमेलन सुरु आहे . या निमित्ताने काढलेल्या या मिरवणुकीत , बेळगाव , हुबळी ,विजापूर ,धारवाड, चित्रदुर्ग , बंगळूर , शिवमोगा , मैसूर आदी भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते . महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श आपण पाळायला हवा . तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी , हे सम्मेलन आयोजित केले आहे असे सांगितले .

याचप्रमाणे प्रेमश्री जोडीदार ह्या विद्यार्थिनीनेदेखील या संमेलनाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली .
ही रॅली , कृष्णदेवराय सर्कल , चन्नम्मा सर्कल , काकतीवेस, गणपत गल्ली , मारुती गल्ली , किर्लोस्कर रोड , कॉलेज रोड मार्गे जाऊन , लिंगराज कॉलेजच्या मैदानावर , रॅलीची सांगता करण्यात आली . यावेळी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .


Recent Comments