Kagawad

कागवाड येथे मराठी पत्रकार दिन साजरा

Share

कागवाड येथे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा संचालक सुकुमार बन्नोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी झालेल्या समारंभात मराठी पत्रकारसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन कागवाड तालुका श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अरुण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी पत्रकार दिन कागवाड येथे सन 1990 पासून निरंतरपणे श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा संचालक सुकुमार बनोरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे येथील पत्रकारांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन ग्रामीण भागामध्ये ते करत असलेल्या निस्वार्थ सेवा ओळखून राजकीय मंडळीनी साथ द्यावे असे त्यांनी सांगितले.

श्रमिक कर्नाटक कामगार संघटनेचे संस्थापक अरुण जोशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बोलताना सांगितले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बांधव आहेत. ते समाजाच्या एकंदरीत सुधारणेसाठी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्नात असतात. त्यांच्याही समस्या समाजसेवकांनी, राजकीय मंडळींनी समजावून घ्यावेत असेही ते सांगितले.

पत्रकार दिन कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार पाटील, सचिन माने, संदीप परांजपे, संजय काटकर, राजकुमार चोळके यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Tags: