चिक्कोडी उपविभागाचे प्रांताधिकारी माधव गीते यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे एका ऊसतोड कामगाराचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

होय, चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा-रायबाग रस्त्यावर झालेल्या एका दुचाकी अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला चिक्कोडी उपविभागीय अधिकारी माधव गीते यांनी त्यांच्याच वाहनातून नेऊन रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार होऊन त्याचा जीव वाचण्यास मदत झाली.

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद येथील ऊसतोडणी कामगार असलेल्या दत्ता यांच्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक बसून अपघात झाला. याच मार्गाने रायबागकडे जाणारे चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते यांनी आपले वाहन थांबवून जखमीला मदतीचा हात दिला. त्यांनी त्यांच्या शासकीय वाहनाचा चालक व अन्य एकाच्या मदतीने जखमीला चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार मिळवून दिले. जखमी दत्ता बरा झाला आहे. त्याच्या मेंदूचे सी.टी. स्कॅन करण्यासाठी त्याला बेळगावमधील बीम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. प्रांताधिकारी माधव गीते यांच्या या माणुसकीचे जनतेतून कौतुक होत आहे.


Recent Comments