Belagavi

उषा कॉलनी येथील महालक्ष्मी मंदिरात सिद्धेश्वर स्वामीजींना श्रद्धांजली

Share

बेळगावातील बॉक्साईट रोडवरील उषा कॉलनी येथील महालक्ष्मी मंदिरात विजापुरातील ज्ञानयोगाश्रमाचे लिंगैक्य ज्ञानयोगेंद्र श्री सिद्धेश्वर स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंदिराच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संदीप जिंद्राळी व माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी लिंगैक्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर सर्वांनी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन केले. स्वामीजींच्या फोटोला आरती करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे यांनी, सर्वांनी स्वामीजींचा आदर्श जीवनात अंगीकारून आपले जीवन चांगले बनवावे, अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी कल्पना हेगडे, सरोजा हुबळी, सरस्वती भट, सुजाता पाटील, जे. व्ही. हिरेमठ, सतीश माळवदे, नागेश पाटील, प्रभू सौंदत्ती व महिला विभाग व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

Tags: