शोतोकोन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देहराडून (उत्तराखंड) येथे झालेल्या पाचव्या ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप-2022 मध्ये श्रीशैल व श्रेयस कुंडेकर या बंधूंनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण आणि कांस्य पदके पटकावली आहेत.
शोतोकोन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीने उत्तराखंड राज्यातील देहराडून येथे नुकतीच पाचवी ओपन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा-2022 पार पडली. या कराटे स्पर्धेत विजयनगर, हिंडलगा येथील श्रीशैल व श्रेयस कुंडेकर या बंधूंनी चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत श्रीशैल कुंडेकर याने काता प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक आणि कुमीते प्रकारात तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले. तर श्रेयस कुंडेकर याने काता प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक आणि कुमीते प्रकारातही प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले.
प्रमुख पाहुणे गोरखा सुधार सभेचे अध्यक्ष पद्मसिंह थापा आणि उत्तराखंडच्या माजी राज्यमंत्री आणि अखिल भारतीय गोरखा मोर्चाच्या अध्यक्षा सारिका प्रधान यांच्याहस्ते श्रीशैल व श्रेयस यांना पदके देऊन गौरविण्यात आले. यातील श्रीशैल कुंडेकर हा केएलई संस्थेच्या आरएलएस बीसीए महाविद्यालयात दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे. तर श्रेयस कुंडेकर हा वनिता विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत आहे. हे दोघेही बंधू कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील (चलवेनहट्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली एसकेएसए विजयनगर, हिंडलगा शाखेत सराव करत आहेत.


Recent Comments