Banglore

रामदुर्ग अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची भरपाई : मुख्यमंत्री बोम्मई

Share

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला रामदुर्गजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळूर येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, रामदुर्ग अपघातासंदर्भात आपण बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

दहा पदरी रस्त्याच्या हवाई पाहणीत आढळून आलेल्या त्रुटी पाहता दहा पदरी रस्त्याचे पुनरावलोकन करून काम पूर्ण झाल्यानंतरच लोकार्पण करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा करू, परिस्थितीचा आढावा घेऊन निष्कर्षापर्यंत पोहोचू, असे ते म्हणाले.

भाजप नेते सँट्रो रवीच्या संपर्कात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी सँट्रो रवीबद्दल सांगितले आहे, तो कोण आहे हे आपल्याला माहित नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Tags:

savadatti-accident-cm-announces-to-give-5-lakh-compensation-to-the-family-who-died/