Dharwad

हद्दपार होऊनही खुलेआम फिरणाऱ्या रौडीशीटरला धारवाडमध्ये पकडले..!

Share

खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हद्दपारीचे आदेश असतानाही धारवाडमध्ये खुलेआम फिरणाऱ्या रौडीशीटरला विद्यागिरी पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

धारवाड शहरातील दानुनगर येथील इरण्णा पाटील हा राडेबाज रौडीशीटर असून त्याला पोलिसांनी पकडले. अटक करण्यात आलेला आरोपी खंडणी व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात हद्दपार होता. हुबळी-धारवाड डीसीपीनी त्याला 15 दिवसांपूर्वी 30 डिसेंबर रोजी धारवाडमधून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.

आरोपीला आदेश मिळूनही तो धारवाड शहरात फिरत होता. यावेळी धारवाड विद्यागिरी पोलिसांची नजर त्याच्यावर पडली. त्यानंतर पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला व तो बसमध्ये चढला. मात्र, पाठलाग करत पोलिसांनी बसमध्ये चढून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रौडीशीटर राडेबाजाला ताब्यात घेऊन विद्यागिरी पोलिस ठाण्यात नेले. पोलीस स्वत:हून आज रात्री धारवाड येथून हद्दपार करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Tags:

/police-caught-exile-accused-in-dharwad-who-is-roaming-in-outside/