मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देणार की नाही हे 24 तासांत स्पष्टपणे सांगावे, असे आव्हान विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिले.
सरकारने पंचमसाली समाजाला 2 डी आरक्षण जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगावातील गांधी भवनात आज गुरुवारी पंचमसाली समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणीची सभा झाली. यावेळी 2 डी आरक्षण फेटाळण्यात आले.
पंचमसाली समाजाला व डी आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आम्ही सरकारला कोणतीही धमकी दिली नाही. सुवर्णसौधला घेराव घातला असता तर तो धमकी ठरली असती असे ते म्हणाले. बेळगाव अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यापासून आमची दिशाभूल करत आहेत. ते कधी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवतात. त्या आयोगाचे अध्यक्ष कधी पाऊस आणि कधी कोरोना अशा खोट्या सबबी सांगतात. बोम्मई यांनी आईच्या नावाने शपथ घेतली आणि अशी फसवणूक केली. पंचमसालींनी समाजाला त्यांनी खुळ्यात काढले असा टोलाही त्यांनी लगावला.
आता आरक्षणाच्या दिवशी फोन करून भेटू असे बोम्मई यांनी सांगितले होते. काही यूट्यूब चॅनेलवर यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा होती. हे सत्यापासून दूर आहे असे ते म्हणाले. 22 डिसेंबर रोजी सुवर्णसौधला घेराव घालणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण बोम्मई यांचे आईवर खूप प्रेम आहे. अशा आईची शपथ त्यांनी घेतल्याने आम्ही आमचा निर्णय मागे घेतला. यावेळचे आंदोलन तितके सोपे नाही. 24 तासात पंचमसाली समाजाला आरक्षण देणार का, घरी जाणार? असा सवाल त्यांनी केला. बसवराज बोम्मई यांना बहुधा भाजपचे शेवटचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. पंचमसाली समाजाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी आमच्या समाजाची फसवणूक केल्याची भावना संपूर्ण पंचमसाली समाजात निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
बैठकीत बोलताना माजी आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईच्या नावाने शपथ घेऊन पंचमसाली समाजाला 2 डी आरक्षण देऊन आमच्या समाजावर अन्याय केला आहे. गेल्या 22 डिसेंबरला सुवर्णसौधला घेराव घातला असता, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागवला आहे, 29 तारखेला मंत्रिमंडळ बैठक बोलावून आरक्षण देतो आश्वासन देऊन शब्द फिरवला असल्याचे सांगितले.
काशप्पनवर म्हणाले, पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देऊ असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रत्यक्षात 2 डी आरक्षण दिले आहे. त्याऐवजी त्यांनी थ्रीडी दिला असता तर आम्ही चित्रपट पाहत असतो, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
जोपर्यंत आमच्या मुलांच्या हातात आरक्षणाची कागदपत्रे मिळत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. पंचमसाली समाजाने केवळ शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागितले. मात्र त्यातही बोम्मई यांनी आडकाठी आणल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावेळी पंचमसाली समाजाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments