बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथील भाविक शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले आहेत. येथील भाविक डोंगराकडे रवाना होण्याआधी त्यांनी गावात वाजत-गाजत भंडाराच्या उधळणीत मिरवणूक काढली.

यावेळी ‘उदो ग आई उदो’चा गजर करत भाविकांनी मिरवणुकीत भाग घेतला. आपल्या सोबत आठ दिवसांचे साहित्य बांधून घेऊन सर्व भाविक यल्लम्मा यात्रेकरिता रवाना झाले. सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीचे विविध कार्यक्रम धार्मिक विधींसह पार पाडल्यानंतर हे भाविक बेळगावला परतणार आहेत.


Recent Comments