Vijayapura

25 लाखांहून अधिक लोकांनी घेतले सिद्धेश्वर स्वामींचे अंत्य दर्शन

Share

चालता-बोलता देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर स्वामींचे सुमारे 25 लाखांहून अधिक लोकांनी अंत्यदर्शन घेतल्याची माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर यांनी दिली.

विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे सोमवारी सायंकाळी देहावसान झाले. त्यानंतर विजापुरातील सैनिक शाळेच्या आवारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काल सायंकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजापूरचे जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर म्हणाले की, अंत्यसंस्कारावेळी सुरक्षेचे काम तरुणांनीच केले आहे. अत्यंत सुरळीतरीत्या अंत्यविधी पार पडला. भक्तांनी भरभरून सहकार्य केले. या सगळ्याचे कारण स्वामीजींची शिकवण हेच आहे. अंत्यसंस्काराच्या दिवशी कोणत्याही कारणास्तव वीज खंडित करू नये, असे आदेश दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचे आभार मानले.

Tags:

more than 25 lakh devotees took darshan of siddeshwara swamy