लग्नाचे आमिष दाखवून दलित तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने करून , जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
बुधवारी , दलित संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली , या प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिच्या पालकांनी , जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन , न्याय मिळवून देण्याची मागणी केली .
२४ नोव्हेंबरला ही घटना घडली असून , तक्रार दाखल करून देखील याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. तसेच संबंधित पोलीस स्थानकामध्ये प्रकरण नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली . मात्र कर्नाटक दलित संघर्ष समितीने सतत पाठपुरावा केल्यानंतर , पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली . मात्र आता या प्रकरणातील आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे समजते . या संबंधी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मराठीला माहिती दिली .

पीडित तरुणीच्या आई , आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याने तिला न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली . या प्रकरणातील पीडित तरुणीने आपली मराठीसमोर आपली व्यथा मांडून न्याय देण्याची मागणी केली .
यावेळी , महांतेश तळवार ,रमेश कोरचेकार , रायप्पा कांबळे , संतोष कांबळे मनोहर आज्जनकट्टी , अण्णासाहेब केंगननावर आणि कर्नाटक दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच पीडित तरुणींसह तिचे पालक उपस्थित होते .


Recent Comments