भाजपचे युवा नेते चिदानंद लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठ येथे भेट दिली आणि कर्नाटक राज्य माध्यान्ह आहार स्वयंसेवा संस्थेचे अध्यक्ष असलेले हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना , चिदानंद सवदीम्हणाले कि , हुक्केरी हिरेमठाशी सवदी कुटुंबाचे अतूट नाते जोडलेले आहेत. श्री आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. आमचे वडील आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतानाही आम्हाला श्रींचा आशीर्वाद असाच सदैव राहो.
श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की लक्ष्मण सवदी हे आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. त्यांच्या घराण्यात गुरू आणि वडीलधाऱ्यांबद्दल तीव्र आस्था आहे . आज त्यांची मुलेही त्याच मार्गाने पुढे जात आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे ते म्हणाले. भाजपचे युवा नेते महांतेश ओकुडा, आरएसएसचे नेते अण्णासाहेब आदी उपस्थित होते.


Recent Comments