DEATH

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

Share

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होईल.

मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. भारतातच नाही तर परदेशात जाऊन त्यांनी उपचार घेतले होते. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्यांनी प्रकृती सुधारली होती. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांना या गंभीर आजाराने पुन्हा ग्रासलं होतं. त्यामुळे ते रुग्णालयात वारंवार उपचारासाठी जात होते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी प्रकृती खालावली होती. मात्र त्यातूनही त्यांनी आजारावर मात केली होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली.

नगरसेवक ते आमदार…राजकीय पार्श्वभूमी
1986 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2002 पर्यंत ते नगरसेवक होते. याचदरम्यान त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर ते महापौरही होते. 2002 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष होते. 2004 मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. त्यातून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. 2004 साली विधान परिषदेचे आमदार होते. 2009 साली विधानसभेवरही आमदार होते. 2014 पासून सलग दोन वेळा भाजपचे विधानसभा आमदार होते. त्यानंतर 2017 मध्ये पिंपरी भाजपचे शहराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

Tags: