Belagavi

लेखक, विचारवंत, कन्नड आंदोलकांनी सिद्धेश्वर श्री ना वाहिली श्रद्धांजली

Share

कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे मंगळवारी लेखक, विचारवंत, कन्नड आंदोलकांनी श्री सिद्धेश्वर स्वामींना श्रद्धांजली वाहिली .

या श्रद्धांजली बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.डी.एस. इंचल होते. बैठकीमध्ये बसवराज जगजंपी, डॉ. प्रा. बी.एस.गावीमठ, डॉ.सरजू काटकर, वाय.आर. पाटील, अशोक चंदरगी,
डॉ. पी. जी. केम्पन्नवर, बसवराज गार्गी, डॉ.राजशेखर, शिरीष जोशी, शंकर बागेवाडी यांनी श्री सिद्धेश्वर स्वामींना श्रद्धांजली वाहिली .

राज्योत्सव महोत्सव समिती, इंचल स्मारक समिती, डॉ. करकी कल्चरल फाउंडेशन, एणगी बाळाप्पा फाउंडेशन, बी. ए. सनदी कल्चरल फाउंडेशन, बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समिती, आर्यन कल्चरल फोरम आदी तसेच साहित्यिक आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन दिवंगत स्वामींना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

Tags: