Accident

आंदोलनासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा हुबळीत अपघाती मृत्यू

Share

आंदोलनासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा हुबळीत अपघाती मृत्यू झाला. बसखाली चिरडला गेल्याने त्याला जीव गमवावा लागला. या अपघातात अन्य दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर किम्स इस्पितळात उपचार सुरु आहेत.

काँग्रेस पक्षाच्या वतीने हुबळीत काल, सोमवारी म्हादई प्रकल्पासाठी जनआंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बसने धडक दिल्याने एकजण चिरडून जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना हुबळी येथील वर्दळीच्या कोप्पीकर रोडवर घडली.

बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हुबळी येथील नेहरू मैदानावर आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे कार्यकर्ते आले होते. जखमीना हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता एकाच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags: