विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून भक्त समाजात शोककळा पसरली आहे. हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींसह अनेक मान्यवरांनी स्वामीजींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींनी मौन पाळून आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामीजी म्हणाले, श्री सिद्धेश्वर स्वामी राष्ट्रसंत होते. आपल्या प्रवचनातून ते अजरामर झाले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांनी शतायुषी व्हावे यासाठी आम्ही महामृत्युंजय स्वामींना होमहवन करून प्रार्थना केली. परंतु त्यांनी या प्रार्थनेचे फळ काही मिळाले नाही. श्री गुरुशांतेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री विरुपाक्षलिंग शिवाचार्य वैदिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संवतकुमार शास्त्री, वेदपटू सुरेश जिनराळी, चन्नाप्पा गजबर उपस्थित होते. माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले की, सिद्धेश्वर स्वामींच्या आशीर्वादाने संकेश्वर श्री दुरुदुंडीश्वर विद्यावर्धक संघ प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. चालता-बोलता देव म्हणविलें जाणाऱ्या स्वामीजींच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एकंदर चालता-बोलता देव म्हणविले जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या निधनाने हुक्केरी-संकेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.


Recent Comments