Hukkeri

सिद्धेश्वर स्वामींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हुक्केरीत होम हवन

Share

विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामी यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी हिरेमठ येथे मृत्युंजय होम केला.

विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते बरे व्हावेत यासाठी ठिकठिकाणी पूजा-प्रार्थना सुरु आहेत. याच धर्तीवर हुक्केरी हिरेमठ येथे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली मृत्युंजय होम करण्यात आला. त्यानंतर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गुरुकुलाच्या वेदवत्स, संवतकुमार शास्त्रींनी वैदिक धर्मातील मंत्रपठण करून श्रींचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि ते शतायुषी व्हावेत, निरोगी जीवन जगण्यासाठी मृत्युंजय जप आणि होम केला आहे असे सांगितले.

यावेळी वैदिक अभ्यासक, शास्त्री व हिरेमठचे भक्त उपस्थित होते.

Tags: