बेळगाव सायकलिंग असोसिएशन तसेच कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या वतीने आयोजित , सायकल स्पर्धा आज हनुमान नगर येथे पार पडल्या .
ग्रामीण भागातील सायकलपटू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी , मागील एक महिन्यापासून तालुका स्तरावर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . आज बेळगाव शहरातील हनुमान नगर येथे , बेळगाव शहर विभागातील विद्यार्थ्यांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
सायकल स्पर्धेला चालना देऊन बोलताना , अनिल पोतदार यांनी सांगितले कि , मागील महिनाभरापासून आम्ही या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करीत आहोत . तालुका स्तरावर ग्रामीण भागातील मुलांसाठी सायकल स्पर्धा घेण्यात आली . यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या . प्रत्येक तालुक्यातून 3मुलगे आणि 3 मुली अशा सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली . आज बेळगाव शहरातील मुलासाठी स्पर्धा घेऊन निवड करण्यात आली . या मुलांच्या आता जिल्हास्तरीय सपर्धा घेतल्या जाणार आहेत ..त्यामध्ये विजेत्या ठरणाऱ्या सायकलपटूना , राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी , बेळगाव सायकलिंग असोसिएशन सर्वतोपरी मदत करण्यात आहे . यावेळी त्यांनी , या स्पर्धेसाठी मदत करणारे के एम एफ चे अध्यक्ष , भालचंद्र जारकीहोळी याना धन्यवाद दिले .

बेळगाव जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आर एच पुजारी म्हणाले कि , या स्पर्धेसाठी , केएमएफ , सायकलिंग अससोसिएशन , शिक्षण विभाग , आरोग्य विभाग , आणि इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे . बेळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विवेकराव पाटील , तसेच केएमएफचे अध्यक्ष , भालचंद्र जारकीहोळी , अनिल पोतदार , पोलीस विभाग ,यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले . 15 तालुक्यांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेतील विजेत्या मुलांना , जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षण देणार आहोत .
हनुमान नगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये , शहरातील अनेक सायकलपटू विद्यार्थी सहभागी झाले होते


Recent Comments