शेडबाळ येथील शेडबाळ अर्बन को-ऑफ बँकेला या वर्षातील जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बेळगाव जिल्हा नागरी, सौहार्द ,सहकारी बँक महासंघाच्या बेळगावातील मराठा को ऑफ बँक सभागृहामध्ये 2021-22 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष बी. बी. कग्गनगी, उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शेडबाळ अर्बन को-ऑफ बँकेचे संचालक भरतेश (लकमागौडा) पाटील यांचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन व शाल देऊन सत्कार करण्यात आला. शेडबाळ अर्बन बँकेने ठेवी, कर्ज वितरण, एकूण एनपीए निव्वळ एनपीए आणि नफ्याच्या जोरावर त्यांनी जिल्हा उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार पटकावला आहे.
शेडबाळ अर्बन बँकेचा यंदाचा नफा 75.22 लाख रुपये असून एकूण सभासद संख्या 4237 असून बँकेकडे ठेवी रक्कम 93.59 कोटी असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. बी. नरसगौडा यांनी सांगितले. जिल्हा उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर भाजपचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी बँकेत येऊन शेडबाळ बँकेचे संचालक भरतेश पाटील यांचा सत्कार केला.


Recent Comments