दक्षिण महाराषट्र शिक्षण मंडळाच्या गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कुलमध्ये , दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला .
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली . शाळेचे मुख्याध्यापक पी ओ पाटील यांनी प्रास्ताविक केले . त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून , व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले .
यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील , युवराज पाटील , तसेच एन वाय पिंगट उपस्थित होते . यावेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली . या व्याख्यानमालेसाठी यल्लोजीराव पाटील तसेच भारती सुळेभावीकर यांनी आर्थिक सहकार्य केले . यावेळी मान्यवरांनी , विध्यार्थ्यांना जिद्द , चिकाटी , ध्येय म्हणजे काय हे उदाहरणासहित स्पष्ट केले .
यावेळी जे पी अगसीमानी , जी एस धामणेकर , कविता गौंडाडकर , प्रगती पाटील , एस एन गावडे , उपस्थित होते . जी एस धामणेकर यांनी सूत्रसंचालन तसेच पूजा जाधव यांनी आभार मानले .


Recent Comments