DEATH

निवृत्त एएसपी बी. एन. शेट्टण्णावर यांचे निधन

Share

शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी आणि निवृत्त अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी. एन. शेट्टण्णावर यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने खासगी इस्पितळात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

शेट्टण्णावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेळगाव जिल्ह्यात पोलीस खात्यात अनेक उच्च पदांवर त्यांनी उत्कृष्टरित्या सेवा बजावली होती. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे तीन मुले आहेत. हट्टी गोल्ड माईन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व आयएएस अधिकारी संजय शेट्टण्णावर यांचे ते वडील होत.

Tags:

balachandra-shettennavar-death/