Banglore

केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण स्कुलच्या इमारतीची केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली पायाभरणी

Share

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बंगळुर ग्रामीण जिल्ह्यातील देवनहल्ली तालुक्यातील आवटी गावात 35 एकर जागेवर पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) अंतर्गत केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण स्कुलच्या इमारतीची पायाभरणी केली.

व्हॉइस ओव्हर :शनिवारी , केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बंगळुर ग्रामीण जिल्ह्यातील देवनहल्ली तालुक्यातील आवटी गावात पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) अंतर्गत केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण स्कुलच्या इमारतीची पायाभरणी केली.

यानंतर बोलताना , केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी , या कार्यक्रमात सांगितले कि , या छोट्याशा कार्यक्रमात , सीबीआयटी ची स्थान बेंगळूर मध्ये होणार आहे आणि , यामुळे पोलीस विभागाचे कार्य अधिक सुगम करण्याचे कार्य होणार आहे . आज बीपीआरडी चे भूमिपूजन होत आहे . बेंगळूर जवळच या प्रशिक्षण केंद्रासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्याने ,त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले . या प्रशिक्षण केंद्रामुळे पोलीस विभागाचे बळ अधिकच वाढेल . समाजाचे विचार २५ , ५० वर्षानंतर बदलत असतात , त्यांचे मार्ग बदलतात , त्यामुळे पोलीस विभागाने हा बदल लक्षात घेऊन , स्वतःलाही बदलले पाहिजे असे ते म्हणाले .

केंद्रीय संसदीय कार्य, खाण आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हा पालक मंत्री डॉ. के. सुधाकर, बीपीआरडीचे महासंचालक बालाजी श्रीवास्तव, आयटीबीपीचे महासंचालक अनिश दयाल सिंग, अतिरिक्त महासंचालक नीरज सिन्हा
कार्यक्रमाला राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद , बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक एम. चंद्रशेखर, बंगळुरू ग्रामीणचे जिल्हाधिकारी आर. लता , जिल्हा पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बालदंडी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते

Tags: