खानापूर-हल्ल्याळ राज्य महामार्गावरील होन्नम्मा देवी तळ्यासमोरील वळणावर काल मध्यरात्री दोनच्या सुमारास एका ट्रक चेसीचा अपघात झाला. नवीन ट्रक चेसीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चेसी उलटली.
चेन्नईहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटून होन्नम्मा देवीच्या तळ्यासमोरील वळणावर शेतात कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत असून आतापर्यंतच्या अपघातांची दखल घेतली गेली नाही.
अपघात झालेल्या ट्रकच्या चालकाने याबाबत बोलताना सांगितले की, हे वळण अतिशय धोकादायक असून रस्ता चांगल्या स्थितीत नसल्यामुळे ट्रकचा ताबा सुटून तो उलटला. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments