केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गेज्जलगेरे डेअरी परिसरात मेगा डेअरीचे उद्घाटन केले.
या मेगा डेअरीच्या उदघाटन प्रसंगी अमित शाह यांनी गोमातेचे पूजन केले . त्यानंतर , त्यांनी उपस्थित मान्यवरांसह मेगा डेअरीच्या कामकाजाची पाहणी केली . यावेळी अमित शाह तसेच उपस्थितांना , डेअरीतील उत्पादने आणि प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आली .

यावेळी आदि चुंचनगिरी मठाचे श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर, मंत्री के. गोपालय्या , आमदार सी. एस. पुट्टराजू, डी. सी. तमन्ना, मनमूलचे अध्यक्ष बी. आर. रामचंद्र आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या हस्ते मन मूल प्रगतीच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


Recent Comments