Belagavi

विठ्ठलाचार्य एन . शिवणगी शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा

Share

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील पाटील गल्ली येथील विठ्ठलाचार्य एन . शिवणगी प्राथमिक व पूर्व प्राथमिक मुलींच्या विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

2022-23 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 27 आणि 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या, या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती कृष्णा भट्ट यांनी केले . यावेळी ते म्हणाले की, अभ्यासासोबतच खेळ महत्वाचे आहेत, विशेषतः मुलींसाठी , खेळ आणि व्यायाम कसे उपयुक्त आहेत, असा उपयुक्त संदेश त्यांनी मुलांना दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शाळेत तेरा वर्षांपासून क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, अनेक इनडोअर आणि आउटडोअर खेळ घेण्यात आले, मुलांनी वैयक्तिक आणि सामूहिक खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला

शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी वडयेर , शाळेच्या शारीरिक शिक्षिका कविता पाटील, मधुरा बाळेकुंद्री, भारती कोळी, अन्नपूर्णा माळी आदी उपस्थित होते.

Tags: