Belagavi

मनरेगा कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी आंदोलन

Share

बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी जिल्हा कामगार मजदूर नवनिर्माण संघ व जागृती महिला संघाच्या सदस्यांनी बुधवारी आंदोलन केले.

2013 ते 2019 या वर्षात 50 दिवस काम करणाऱ्या मनरेगा कामगारांची ओळखपत्रे काही कारणास्तव रद्द कार्यांत आली आहेत . त्यामुळे , ग्राम पंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या कामगारांना , बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सदस्य बनवून त्यांना कामगारांची ओळखपत्र देऊन सामाजिक सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .

तात्काळ काम सुरू करावे आणि समान कामासाठी समान वेतन मिळावे, त्याचप्रमाणे , मनरेगा कामगारांना , बांधकाम कामगारांना सरकारकडून ज्याप्रमाणे किट्स देण्यात येतात तशी किट्स देण्यात यावीत , घर बांधण्यासहीत 5 लाखांचे अर्थसहाय्य सरकारने द्यावे , शिवाय रोजगार हमीच्या कामगारांच्या मुलांना सरकारकडून शिष्यवृत्तीची देण्यात यावी त्याचप्रमाणे लॅपटॉप देण्यात यावा अशी आंदोलकांनी मागणी केली. यावेळी दीपा हलगेकर, कावेरी तेरदाळ आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: