अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाच्या चर्चेला संधी दिली नाही असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सांगितले.
सुवर्णसौध येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, उत्तर कर्नाटकातील ऊस, भात आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे. हे विषय कधीही चर्चेत आले नाहीत. त्यावर चर्चेसाठी दोन दिवस राखीव ठेवू असा सभाध्यक्षांनी सांगितले होते. आम्ही संपूर्ण कर्नाटकाबद्दल बोललो. भाजप नेते उत्तर कर्नाटकबद्दल खूप बोलतात. कोणत्याही भागातील असो, शेतकरी हा शेतकरीच असतो. त्यासाठी काल चर्चा झाली आता आणखी निधी जाहीर करावा.
नडहळ्ळी त्यांच्या सरकारबद्दल बोलू देत. त्यांना नोटिफिकेशन करायला काय जाते?, फक्त भाषण देणे पुरेसे नाही. त्यासाठी उद्या आमचा विजापुरात मेळावा आहे, येथे जे काही फसले आहे ते मी तेथे सांगेन. दीड लाख कोटी द्यायला हवे होते, अनुदान कुठे दिले?, सी. टी. रवी यांना चर्चेला का परवानगी दिली?, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला का दिली नाही?, अधिवेशनात सीमावादावर आम्ही चर्चा घडवून आणली नाही का? असे सवाल सिद्दरामय्या यांनी केले.
चिलुमे प्रकरणावर चर्चा का झाली नाही, या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, सभागृहात आणखी आठवडाभर काम चालू द्या, सगळी सर्वसमावेशक चर्चा करू. अमित शहा येणार म्हटल्यावर अधिवेशनच गुंडाळले, ते आले म्हणून अधिवेशन गुंडाळायचा का? असा सवाल त्यांनी केला.
मी मेळाव्याला जाईन किंवा नाही जाईन, अमित शहा येत आहेत असे सांगून अधिवेशन थांबवले तर कसे? असा संताप सिद्धरामय्या यांनी भाजपवर व्यक्त केला.


Recent Comments