Belagavi

शिक्षण मंत्री बी सी नागेश हिंडलगा कारागृहाला भेट : सावकारांच्या फोटोचे केले अनावरण

Share

शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनीयांनी आज हिंडलगा येथील तुरुंगाला भेट देऊन तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वास्तव्य केलेल्या कोठडीची पाहणी करून कारागृहात सावरकरांच्या फोटोचे अनावरण केले .

यानंतर कारागृहाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कि ,सावरकरांना ज्या कोठडीत स्थानबध्द केले होते त्या कोठडीला भेट दिल्याने मला खूप आनंद आणि समाधान मिळाले आहे . जिथे आम्ही आम्ही बसलो होतो, तेंव्हा आम्हाला सावरकरांसारखे अनेक लढवय्ये आठवले सावरकरांनी एका बारा बाय आठच्या छोट्या खोलीत 100 दिवस काढले आहेत. ही सेल्युलर जेलपेक्षा लहान आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानाला विरोध केल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले . सावरकर हे स्वाभिमानी, महान देशभक्त होते . ते ठिकाण पाहून आपल्याला त्याच्या त्यागाची आठवण झाली .त्यांच्या कोठडीत जाऊन फोटोवर फुले टाकली. शाळा-महाविद्यालयांमध्ये सावरकरांचा फोटो लावला जात आहे का, असा सवाल केला आमच्याकडून असे कोणतेही परिपत्रक जरी करण्यात आलेलं नाही. शाळा-महाविद्यालयांमधील मुलांना स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि बलिदान याबद्दल माहीत असायला हवे .

स्वातंत्र्यलढ्यात लाखो लोकांनी बलिदान दिले. मुलांना स्वातंत्र्यलढ्याची माहिती असावी. माहीत असेल तरच स्वातंत्र्य टिकवता येईल. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाने कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाचा फोटो शाळेत लावल्यास मला आनंद होईल सावरकरांचा फोटो अनावरण केल्याचा मला आनंद आहे असे मंत्री नागेश म्हणाले .

Tags: