Belagavi

महापुरुषांच्या पुतळ्यासाठी सुवर्णसौधमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

बेळगावातील सुवर्णसौधच्या प्रांगणात कित्तूर राणी चेन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, महात्मा गांधीजी, डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज भूमिपूजन केले.

काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बोम्मई यांनी सुवर्णसौधच्या प्रांगणात कित्तूर राणी चेन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, महात्मा गांधीजी, डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात येतील, त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान भूमिपूजन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज पायाभरणी समारंभ पार पडला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री अश्वत्थ नारायण सी. सी. पाटील, मुरुगेश निराणी, ​​के. एस. ईश्वरप्पा, शशिकला जोल्ले आणि विधान परिषदेचे आमदार व सदस्य उपस्थित होते.

Tags: