उत्तर कर्नाटकासाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या 1.7 टीएमसी क्षमतेच्या कळसा 2.18 टीएमसी क्षमतेच्या भांडुरी धरण प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला असून, त्याचा डीपीआर केंद्र सरकारने स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसभेत दिली. बेळगाव अधिवेशनातच ही गोड बातमी आली असून, त्याबद्दल उत्तर कर्नाटकच्या वतीने मी मोदींचे अभिनंदन करतो असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, बेळगाव अधिवेशनात गोड बातमी आली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने डीपीआर स्वीकारून ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे दीर्घकाळाचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे मोदींचे आणि केंद्रीय जलसिंचन मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आमच्या सरकारने 2002 पासून म्हादई योजनेसाठी कळसा येथून पाणी वळविण्याची चर्चा केली तेव्हा गोवा राज्याने विरोधात भूमिका घेतली. बऱ्याच आग्रहानंतर न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आल्यावर आम्ही संघर्ष केला.
पूर्ण पाणीसाठा मिळाला नसला तरीही पाणी वळविण्याची परवानगी देण्यात आली.त्याबाबतची अधिसूचना 2018 मध्ये काढण्यात आली. आता कळसा धरणातून 1.7 टीएमसी आणि भांडुरी धरणातून 2.18 टीएमसी पाणी वळवण्याचा करार झाला आहे असे त्यांनी सांगितले.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण कर्नाटक भागातील जनतेच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीने अभिनंदन करतो. तसेच मी केंद्रीय जलसिंचन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे अभिनंदन करतो आणि या कामासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले राज्याचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांचे मी अभिनंदन करतो असे सांगून, लवकरच आम्ही कामाचा आराखडा तयार करून आम्ही पायाभरणी करून आणि भूमीपूजन करू.
आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे बेळगावात अधिवेशन सुरू असताना ही गोड बातमी आली असे बोम्मई म्हणाले. सभागृहात हा विषय प्रस्तावित होताच सर्व सदस्यांनी बाके वाजवून समर्थन दिले.


Recent Comments