बेळगावातील अंगडी इन्स्टिटयूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड मॅनेजमेंटमध्ये आज उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांच्याहस्ते केटेक लॅबचे उदघाटन करण्यात आले.
खासदार मंगल अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली अंगडी इन्स्टिटयूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड मॅनेजमेंटमध्ये आज उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांच्याहस्ते फीत कापून केटेक लॅबचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

केटेक लॅबचे उदघाटन करून बोलताना मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी आजच्या युगात तंत्र शिक्षणाला खूप महत्व आले असून, विध्यार्थ्यानी कठोर परिश्रम घेऊन ते आत्मसात करण्याचे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांचे खा. मंगल अंगडी आणि संस्थेच्या प्रमुखांनी स्वागत केले. याप्रसंगी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विद्यासागर एस., डॉ. स्पुर्ती पाटील, एआयटीएमचे प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे, प्रशासक राजू जोशी आदी मान्यवर, शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments