गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आज हिंडलगा येथील तुरुंगाला भेट देऊन तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वास्तव्य केलेल्या कोठडीची पाहणी केली.
या भेटीनंतर सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले की, मी तिथल्या सुविधांची पाहणी केली. 800 हून अधिक कैदी या तुरुंगात आहेत, मी त्यांच्या सोयी-सुविधा आणि मर्यादा तपासल्या, सावरकर हिंडलगा कारागृहात होते. त्या कोठडीलाही मी भेट दिली. आमचे सरकार उत्तर कर्नाटकाबाबत कोणत्याही प्रकारे भेदभाव करत नाही. काल देखील आम्ही त्याच्या विकासावर चर्चा केली. उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.


Recent Comments