Vijayapura

सिद्धेश्वर स्वामीजींची प्रकृती ठीक : मंत्री बी. सी. नागेश

Share

विजापूरच्या सिद्धेश्वर स्वामीजींची प्रकृती ठीक आहे. त्यांची भेट घेऊन मी त्यांच्यासोबत शिक्षणात नैतिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत चर्चा केली अशी माहिती शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी आज विजापुरात प्रसारमाध्यमांना दिली.

श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिक्षणमंत्री नागेश यांनी विजापूर येथील ज्ञान योगाश्रमाला भेट दिली. ज्ञानयोगाश्रमाच्या प्रांगणात भाविकांना दर्शन देऊन सिद्धेश्वर स्वामीजी विसाव्याला गेले. आश्रमाच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत स्वामीजी विश्रांती घेत आहेत. शिक्षणमंत्री बीसी नागेश आणि इतर नेत्यांनी पहिल्या मजल्यावरील त्या खोलीत जाऊन त्यांचे दर्शन घेतले.

त्यानंतर बोलताना शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, नैतिक शिक्षणाबाबत स्वामीजींशी चर्चा केली आहे. नैतिक शिक्षणाचा शिक्षणपद्धतीत येत्या काळात समावेश केला जाईल, असे सांगून स्वामीजींनी नैतिक शिक्षणाबाबत सहमती व्यक्त केली आहे. सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रकृतीबाबतच्या अटकळींना पूर्णविराम मिळाला असून, स्वामीजी पूर्णपणे स्वस्थ आहेत असे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी सांगितले.

Tags:

minister-bc-nagesh-in-vijayapura/