Belagavi

कंग्राळी बुद्रुक येथे देवीचा वाढदिवस उत्साहात साजरा

Share

: सालाबाद प्रमाणे यावर्षीही कंग्राळी बुद्रुक येथे देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

मंगळवारी सकाळी वाजत गाजत ताशांच्या मिरवणुकीत महिलांची मंगल कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी भंडाऱ्याची उधळण केली. त्यानंतर देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील महिलांनी तसेच माहेरवासीयांनी देवीची ओटी भरण्याकरिता मंदिरात उपस्थिती लावली होती.

ओटी भरून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखविण्यात आला तसेच गावामध्ये देवीच्या वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईकांना बोलवून देवीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले.

मंदिर परिसर भाविकांनी आणि पूजेचे साहित्य तसेच खेळण्याच्या साहित्याने बहरले होते.

Tags: