बेळगावात नवीन जिल्हा पंचायत इमारतीचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बेळगावातील कचेरी रोडवर उभारण्यात आलेल्या नवीन जिल्हा पंचायत इमारतीचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बोम्मई यांनी फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून जिल्हा पंचायत इमारतीचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी इमारतीची फिरून पाहणी केली. इमारतीत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची प्राधान्याने व्यवस्था करण्याची आणि स्वच्छता राखण्याची सूचना त्यांनी जिपं सीईओ एच. व्ही. दर्शन यांना केली.

यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments