महाराष्ट्र विधानसभेत सीमावादासंबंधी , कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच यावर ठराव करण्यात आला . यावर प्रत्युत्तर देताना , कर्नाटकचे काँग्रेस नेते ईश्वर खंडरे यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही असे विधान सुवर्णसौध समोर केले .
काँग्रेस नेते ईश्वर खंडरे म्हणाले की, कर्नाटकचा एक इंचही जागा महाराष्ट्र राज्याला देणार नाही . महाराष्ट्र राज्य विनाकारण राजकीय द्वेषाने हे करत आहे याचा मी तीव्र निषेध करतो महाराष्ट्रात एक इंचही जमीन जाऊ शकत नाही, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


Recent Comments