वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीच्या पूर्ततेसाठी , बेळगावच्या वकिलांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर धरणे आंदोलन छेडले . यावेळी वकिलांनी सुवर्णसंधी इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
मंगळवारी ,बेळगाव बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीस्तव, सुवर्णसौध समोर ठिय्या छेडण्यात आले . महामार्ग क्रमांक ४ वर बसून वकिलांनी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली . कायदा मंत्र्यांनी येऊन आपले निवेदन स्वीकारून , मागण्यांच्या पूर्ततेची हमी द्यावी यासाठी त्यांनी , जोरदार घोषणाबाजी केली .
मात्र कायदा मंत्री आंदोलन स्थळी न आल्याने , संतप्त वकील मुख्य गेटजवळ आले आणि आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी कायदा मंत्री माधू स्वामींना कमिशन द्यावे यासाठी ते पैसे गोळा करीत होते .
सुवर्णसौधजवळील मुख्य प्रवेशद्वारावर वकिलांच्या आंदोलनामुळे मोठा गोंधळ उडाला . यावेळी त्यांनी कायदामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली .
वकिलांच्या आंदोलनाचा फटका मंत्री मुरुगेश निरानी यांनाही बसला . गुप्तचर विभागाचे कर्मचारी दुचाकीवरून सुवर्णसौधमध्ये येत असताना , निरानी यांनी त्यांच्या दुचाकीवरून , सुवर्ण सौधचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडले आणि कार्यक्रमाला गेले
याचवेळी वकिलांना शांत करण्यासाठी मंत्री आर अशोक पुढे आले.वकिलांशी चर्चेत झालेल्या चर्चेत वकील संरक्षण कायदा लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . जानेवारीत संयुक्त अधिवेशन होणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत साधक-बाधक गोष्टींवर चर्चा करून कायदा अमलात आणायला हवा, असे अशोक म्हणाले. (फ्लो )
वकिलांच्या या उग्र आंदोलनावर नियंत्रण मिळवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले . यावेळी वकील आणि पोलिसांच्यामध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली . सुवर्णसौधच्या गेटसमोर तणावाचे वातावरण कायम होते
बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करीत काही वकील सुवर्ण सौधच्या मुख्य गेटच्या 30 फूट गेटवर चढले
पोलिस आणि अधिकारी वकिलांना विनवण्या करताना दिसून येत होते .


Recent Comments