बेळगाव कन्नड भवन क्षेमाभिवृद्धी संघाच्या कन्नड भवन रंगमंदिराचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बेळगाव कन्नड भवन क्षेमाभिवृद्धी संघातर्फे बेळगावातील नेहरुनगरमध्ये कन्नड भवन उभारण्यात आले असून, तेथे रंगमंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते त्याचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गदग डंबळ तोंटद मठाचे जगद्गुरू सिद्धराम स्वामीजी, मंत्री गोविंद कारजोळ, कन्नड साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष महेश जोशी, ज्येष्ठ कलावंत गिरिजा लोकेश, खासदार मंगला अंगडी, माजी खासदार आणि केएलई अध्यक्ष प्रभाकर कोरे आदी उपस्थित होते.


Recent Comments