बेळगाव शहरातील अनगोळ येथील बेमको हायड्रॉलिक्स ते चौथ्या रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याला ‘बसवराज बोम्मई रोड’ असे नाव देण्यात आले.
K.L.E. संस्थेच्या डॉ. शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी ‘बसवराज बोम्मई’ मार्ग या फलकाचे अनावरण केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्याचे, नामकरण करण्याबरोबरच शोभिवंत विद्युत दिव्यांचे उद्घाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीशैल कांबळे, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.प्रवीण बागेवाडी आदी या वेळी उपस्थित होते.


Recent Comments