Belagavi

60 व्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकले बेळगावचे स्केटर्स

Share

60 व्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपटूंनी चांगली कामगिरी बजावली आहे.

बेंगळूर येथे 11 ते 22 डिसेंबर 2022 दरम्यान झालेल्या 60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये कर्नाटक राज्य संघातून खेळताना बेळगावच्या स्केटर्सनी एकूण 3 सुवर्ण आणि 5 कांस्य अशी एकूण 8 पदके जिंकली. या चॅम्पियनशिपमध्ये 32 राज्यातून सुमारे 4500 हुन अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता
बेळगावच्या पदक विजेत्या स्केटिंगपटूंची नावे अशी :

स्पीड स्केटिंग : आराध्या पी 1 सुवर्ण, 1 कांस्य, विशेष मुलांचे स्पीड स्केटिंग : सई पाटील १ सुवर्ण, अल्पाइन स्केटिंग : साईराज मेंडके 1 सुवर्ण, इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग : अवनीश कोरीशेट्टी 1 कांस्य, रोलर डर्बी श्रेया बागलकोट 1 कांस्य, स्फुर्ती बागलकोट 1 कांस्य, शर्वरी दड्डीकर 1 कांस्य.

हे सर्व स्केटर्स गुड शेफर्ड स्कूल स्केटिंग रिंक व केलई सोसायटी स्केटिंग रिंकवर प्रॅक्टिस करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या सर्व स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे, शाम घाटगे, माजी आमदार रमेश कुडची, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, केआरएसए सरचिटणीस इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Tags: