वर्षाचे 365 दिवस मला गोडच असतात. मंत्रिपद मिळाले काय अन न मिळाले काय मी खूषच असतो असे आ. रेणुकाचार्य यांनी सांगितले.
सुवर्णसौधमध्ये आज मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी, मुख्यमंत्री दिल्लीहून येऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही गोड बातमी देतील का, असा सवाल भाजप आमदार रेणुकाचार्य यांना केला. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी 2009 ते 2012 पर्यंत मंत्री म्हणून काम केले आहे. मी आनंदी आहे, मी नेहमीच आनंदी असतो. हजारो, लाखो करोडपती आहेत.
तरीही लोकांनी मला, सामान्य माणूस आमदार म्हणून निवडून दिले, त्यापेक्षा मोठे पद माझ्याकडे नाही, जनादेश खूप महत्त्वाचा आहे, मला पुन्हा जनादेश मिळेल, असा विश्वास आहे.निवडणुकीनंतर होणाळी मतदारसंघात जनते दिल्यावर प्रसारमाध्यमांनी राज्याला माझी ओळख करून दिली. पक्षाने सर्व प्रकारे स्थानमान दिले आहे. होणाळी मतदारसंघात संघर्ष केल्यामुळेच तिकीट दिले आहे असे रेणुकाचार्य म्हणाले.


Recent Comments