Belagavi

राज्य सरकारच्या विरोधात युवा काँग्रेसचा भव्य निषेध मोर्चा, आंदोलन

Share

राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आज युवा काँग्रेसने सुवर्णसौधवर भव्य निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. मात्र सुवर्णसौधवर पोहोचण्यापूर्वीच अलारवाड येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. या दरम्यान, युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ४०% कमिशनच्या भ्रष्ट भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

युवा काँग्रेसचे राज्य अध्यक्ष मोहम्मद नालपड यांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सुवर्णसौधवर मोर्चा काढून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र अलारवाड येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून बसमधून कोंबून नेले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी बोलताना युवा काँग्रेस राज्याध्यक्ष महंमद नालपड यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. भाजप सरकार युवक विरोधी सरकार आहे, आधी त्यांनी आमचे पैसे चोरले आता ते आमची मते चोरत आहेत. विरोधात जो कोण बोलेल त्याच्यावर ईडी, आयटी छापे टाकतात. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष केम्पय्या यांनी मोदींना पत्र लिहून यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही. भाजप सरकार हे लोकशाही विरोधी सरकार आहे. तुम्ही कितीही घाबरवलात तरी तुमच्याविरुद्धचा लढा सुरूच राहील.

या 40 टक्के कमिशनच्या भ्रष्ट सरकारला उलथून टाकेपर्यंत युवक काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आज सुवर्णसौधला घेराव घालणार आहोत, आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांचा ताफा आहे. पण आमचा लढा पोलिसांचीही आहे आणि जनतेसाठीही आहे. या सरकारने बंगळुरूमधील चिलुमे एजन्सीने मतांची चोरी करण्याची परवानगी दिलीय का?, पीएसआय भरती घोटाळा झाला, प्रत्येक विभागात भरतीत घोटाळा झाला आहे. त्यांना त्याला घरी पाठवायला नको का? सुवर्णसौधपर्यंत हा आवाज पोहोचवणार आहोत. इथे सुरू असलेले अधिवेशन लोकांच्या समस्येवर बोलण्यासाठी आहे की तुमच्या कमिशनबद्दल बोलण्यासाठी आहे? असा घणाघात मोहम्मद नालपड यांनी केला.

युवक काँग्रेसच्या निषेध सभेला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिले. सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. आज तुमच्या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी मी विधानसभेतून आलो आहे. नालपड अध्यक्ष झाल्यापासून चांगले काम करत आहेत. कोविडनंतर अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. 40 टक्के कमिशन सरकारबाबत तरुणांचा भ्रमनिरास झाला आहे. तुमच्या संघर्षाला आमचा सदैव पाठिंबा राहील असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या

भाजप सरकारच्या कुशासनाच्या विरोधात लढा, सरकारविरोधातील लढाईत आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, असे एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
दरम्यान, अलारवाडजवळ मोर्चा आल्यावर पोलिसांनी बॅरिकेड लावून तो अडवला. त्यावेळी मोहम्मद नालपड यांनी हायड्रामा केला. त्यांनी बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्याना रोखले. यावेळी त्यांची व पोलिसांची वादावादी झाली. पोलिसांनी मोहम्मद नालपड याला ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले.

या दरम्यान, पोलिसांपासून वाचण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचा एक तरुण कार्यकर्ता नाल्यात पडला
दहा फूट खोल नाल्यात पडलेल्या या कार्यकर्त्याची पोलिसांनीच तत्काळ धाव घेत सुटका केली. बेळगावमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली.

Tags: