Athani

शिवानंद तगडूरू यांची अथणी गच्चीन मठाला भेट

Share

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूरू आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुराज हुगार यांनी आज अथणी येथील गच्चीन मठाला भेट देऊन महातपस्वी मुरुगेंद्र शिवयोगी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा मोटगी मठातर्फे प्रभु चन्नबसव स्वामीजी आणि अथणी तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना तगडूरू म्हणाले की, विजापूर येथे 9 व 10 जानेवारी रोजी श्रमिक पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून, प्राथमिक बैठका घेऊन आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

या वेळी सी. ए. इटनाळमठ, अण्णासाहेब तेलसंग, विजयकुमार अड्डहळ्ळी, परशुराम नंदेश्वर, राजू गाळी, रमेश बादवाडगी, राकेश मैगुर आदी उपस्थित होते.

Tags: