Belagavi

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन : एमईएस नेत्यांसह कार्यकर्ते रवाना

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून, तो रद्द करणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात , कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी , आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना झाले .

बेळगावमधील अधिवेशनाच्या विरोधात तसेच आपली महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा आयोजित केला जातो . मात्र यंदा रीतसर परवानगी मागून देखील , कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे कारण देत , महामेळावा परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करून , महामेळाव्याची परवानगी देखील नाकारण्यात आली . मराठी माणसांच्या लोकशाही हक्कांची पायमल्ली झाल्याने या विरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी , महाराष्ट्र एकीकरण समितीने आज सोमवारी , कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे . कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत , पंतप्रधान नरेंद्र मोदींना सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन दिले जाणार आहे .

आज सकाळी कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी , महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्याची , शिवाजी उद्यानातील , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.  यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार , प्रकाश मरगाळे यांनी सांगितले कि आज आम्ही , कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत , भारताचे पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत . यामार्फत बेळगावमधील सीमावासीय मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत . आमच्या या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीयांच्या पाठिंबा आहे .भारताच्या गृहमंत्र्यांनी ज्यावेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली ,त्यावेळी बेळगावमधील परिस्थिती आहे तशीच ठेवावी कर्नाटकाने ते पाळले नाही . यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारने मराठी बांधवांवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला .

कोल्हापूरला जातेवेळी , रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी , आम्ही कार, बस , ट्रक ने कोगनोळी येथे एकत्र जमणार आहोत . त्या ठिकाणी हा सर्वपक्षीय कार्यक्रम होणार आहे . आम्ही महाराष्ट्र सरकाराला विनंती करणार आहोत कि , सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आहोत हे दर्शवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने एक दिवस बंद पाळावा .

यावेळी एमईएस नेते मालोजी अष्टेकर , नगरसेवक रवी साळुंके, विकास कलघटगी , शुभम शेळके यांच्यासह २० हून अधिक नेते यायला उपस्थित होते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर हे सर्वजण चारचाकी वाहनांमधून कोल्हापूरकडे मार्गस्थ झाले . कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसीपी नारायण भरमणी, चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Tags: